Mon, Nov 19, 2018 14:46होमपेज › Satara › छगन भुजबळांच्या जामीनावर शरद पवार प्रथम बोलले

भुजबळांच्या जामीनावर शरद पवार प्रथमच बोलले

Published On: May 09 2018 5:16PM | Last Updated: May 09 2018 5:16PMसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सातार्याततील दौर्यानत जोरदार बॅटिंग केली. राजकीय पटलावरील अनेक मुद्यांना ते सडेतोडपणे सामोरे गेले. पत्रकार परिषदेत छगन भुजबळाच्या अनुषंगाने त्यांना बोलते करण्यात आले. 

वाचा : लातूर विधानपरिषद : कराडांच्या माघारावर पवारांचा गौप्यस्फोट 

छगन भुजबळ यांच्या जामीनाबाबत विचारले असता  पवार म्हणाले, त्यांना जामीन मिळाल्याचा आनंद आहे. मात्र ही न्यायालयीन बाब आहे. अजून निकाल लागलेला नाही. मूळ केस जागेवरच आहे. या केसमधून ते बाहेर पडतील त्यावेळी आम्हाला हर्षवायू, अत्यानंद होईल.  

वाचा: निवडणुकीपर्यंत सगळ्यांची कॉलर खाली येईल : शरद पवार

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. 

Tags : Chhagan Bhujbal, NCP, Sharad Pawar