Fri, Feb 22, 2019 06:21होमपेज › Satara › रामराजेंच्या प्रयत्नांमुळे धोम- बलकवडीचे पाणी अंतिम टप्यात

रामराजेंच्या प्रयत्नांमुळे धोम- बलकवडीचे पाणी अंतिम टप्यात

Published On: Feb 07 2018 12:51PM | Last Updated: Feb 07 2018 12:51PMफलटण : प्रतिनिधी 

फलटण  तालुक्यातील अतिदुर्गम दुष्काळी पट्टयात अनंत अडचणींतर यशस्वीरित्या धोमबलवकडीचे पाणी आणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या भागास दुष्काळाच्या यातनातुन मुक्त केले आहे.

जावली (ता.फलटण) येथील लिंबबाबा मंदिरापर्यंत पाणी पोहचले असून कृष्णामाईची आतुरतेने वाट पाहणार्या जावली व मिरढे परिसरातील शेतकर्यांनी आज आनंदोत्सव  साजरा केला.  भैरवानाथ मंदिरामागील ओढ्यात सोडण्यात आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे विधीवत पुजन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, धोमबलवकडी कालव्याचे अभियंता घोगरे यांचेसह शेतकर्यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील टप्प्यात दुधेबावीपर्यंत पाणी पोहचले होते. त्यानंतर सहा ते सात किलोमीटरच्या टप्यात बोगद्यांची कामे सुरु असल्याने विलंब झाला होता.  यावेळी रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कालव्याचे अभियंता घोगरे, अभियंता शेडगे यांनी  बोगद्यांची कामे अल्पवेळेत पुर्ण केली. तर एकूण कालव्याचे १४१ किलोमीटर काम पुर्ण झाले असून त्यामधुन यशस्वीरित्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे चालु आवर्तनामध्ये या पाण्याचा लाभ मिरढे व जावली गावांना घेता आला आहे.