Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Satara › फुटलेल्या पाइपलाइनचे पाणी रस्त्यावर

फुटलेल्या पाइपलाइनचे पाणी रस्त्यावर

Published On: Jan 01 2018 10:48AM | Last Updated: Jan 01 2018 10:48AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

सातारा येथील यादोगोपाल पेठेत पाणी पुरवठा करणारी पाईप फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून या परिसरात नळाला पाणी आले नसल्याने नववर्षाच्या तोंडावरच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाईपलाइन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठीदेखील अडचण होत आहे; तसेच पाणीमिश्रित कचऱ्याने नाले तुंबल्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाकडून याची वेळीच दखल घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.