Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    



होमपेज › Satara › सावधान ! गर्दीत होतेय ‘हात की सफाई’

सावधान ! गर्दीत होतेय ‘हात की सफाई’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





कण्हेर : बाळू मोरे

सध्या लग्नसराई सुरु असल्याने मंगल कार्यालयात धामधूम सुरु आहे. याच धामधुमीत चोर्‍या होण्याचे प्रमाण अलिकडच्या काही वर्षात कमालीचे वाढले आहे. त्याचबरोबर गर्दी खेचणार्‍या वाढदिवस असो अथवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात आता चोरट्यांचा शिरकाव झाला असून हातोहात पाकिटे व मोबाईल लंपास होत आहेत. या प्रकारावर पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सातारा शहर व तालुक्यात सध्या लग्‍नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. यानिमित्ताने चोरट्यांची एक टोळी कार्यरत असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. लग्‍नाची अथवा मोठमोठ्या वाढदिवसाची गर्दी लक्षात घेवून चोरटे या धामधुमीचा गैरफायदा उठवत आहेत. ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यावर या चोरट्यांचा  वॉच असून संधी मिळताच  ‘हात की सफाई’ दाखवत आहेत. त्यामुळे वधू-वर कुटुंबियांची चांगलीच तंतरली आहे. 

लग्नकार्य आयोजित असलेल्या मंगल कार्यालयाचे मालक वधू-वर मंडळींना केवळ कार्यालयाचे भाडे आकारुन जेवणाची भांडी विवाह मालकाच्या ताब्यात  देऊन मोकळे होतात. मात्र आकारण्यात येणार्‍या भाड्याच्या तुलनेत कार्यालयात काहीच सुरक्षा नसते. चोरी करणार्‍यांची टोळी विवाह सोहळा जशा प्रकारचा असेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने पेहराव करून कार्यक्रमात घुसून चोर्‍या करत आहेत. विवाह सोहळ्यात ओळखीचा प्रश्‍न येत नसल्याचा फायदा ते घेत आहेत. वधू अथवा वराकडील पाहुणे असल्याचे भासवण्याचे कसब बाळगून थेट वधू अथवा वराच्या खोलीत प्रवेश मिळवत आहेत. एखादी बॅग हेरुन पद्धतशीरपणे काही तरी घेण्यादेण्याच्या बहाण्याने हात की सफाई करुन बेमालूमपणे हे चोरटे फरार होत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीने बसवणे आता गरजेचे बनले आहे.  

Tags : satara, satara news,  wedding ceremony,  rural areas, watch  thieves,






  •