Wed, Jan 23, 2019 10:53होमपेज › Satara › अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीलाच पेटवले!

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीलाच पेटवले!

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 1:51AM

बुकमार्क करा

पाटण : प्रतिनिधी

नवर्‍याचे दुसर्‍या ठिकाणी अनैतिक संबंध आहेत, या संशयाने नवरा-बायको यांच्यात झालेल्या वादाने परिसीमा गाठली. रिसवड येथील एका विवाहितेने नवर्‍याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नवरा गंभीर जखमी झाला आहे.

बाळू रोकडे हे गवंडी काम करतात. त्यांचे गावातील एक महिलेशी अनैतिक सबंध असल्याचा संशय त्यांची बायको सीताबाई हिला होता. या कारणाने त्यांच्यात वाद झाला. झोपेत आसलेल्या बाळू याने आरडाओरडा करताच शेजारीच राहणारा त्यांचा पुतण्या रवींद्र याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न केला. यामध्ये ते साठ टक्के भाजले असून, त्यांना उपचारांसाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नवर्‍याच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सीताबाई बाळू रोकडे (वय 39) हिला कोयना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुतण्या रवींद्र आनंदा रोकडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास स.पो.नि. एन. आर. चौखंडे करत आहेत.