Mon, Sep 24, 2018 17:20



होमपेज › Satara › वाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

वाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 10:14PM

बुकमार्क करा





वाई : प्रतिनिधी

रविवार पेठ येथून क्लासवरून सायकलने घरी निघालेल्या अकरा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. मात्र, या घटनेमुळे पालक व विद्यार्थीवर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

गणपती आळी येथील सहावीतील विद्यार्थी रविवार पेठ घोरपडे हॉस्पिटल येथून सायकलने घरी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या माणसाने सायकलला मोटारसायकल आडवी मारून मुलाच्या हाताला धरून बळजबरीने त्यास दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. या मोटारसायकल स्वाराने तोंडाला मास्क बांधले होते. मुलाने प्रसंगावधान दाखवत दुचाकीवर लाथ मारून तेथून पळ काढला. पुणे पासिंगची ही मोटारसायकल असून त्यानंतर काही वेळातच त्याने धूम ठोकली.

मुलाने घरी येऊन रडायला सुरुवात केली. त्यानंतर हा प्रकार त्याने पालकांना सांगितला. पालकांनी या घटनेची माहिती क्लासमध्ये इतर विद्यार्थी व पालकांना सांगून त्यांना सावध केले. याबाबतची माहिती वाई पोलिसांना देण्यात आली. वाई शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, देखभालीअभावी त्याचे तीन-तेरा वाजले आहेत.