Mon, Aug 19, 2019 05:29होमपेज › Satara › कार्यपद्धती बदलल्याने पोलिसांच्या कामाच्या व्याख्या बदलल्या 

कार्यपद्धती बदलल्याने पोलिसांच्या कामाच्या व्याख्या बदलल्या 

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 11:02PMवडूज : वार्ताहर

जगभरातील कार्यपद्धती बदलल्यामुळे पोलिसांच्या  हितानुसार कामाच्या व्याख्या बदलल्या आहेत. कामांचे व्यवस्थितपणे नियोजन करून कामाचे वाटप झाले तरच पोलीस ठाणे व त्याअंतर्गत असणारे कर्मचारी हे कुटुंबासारखे भासतील, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

येथील पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने आयोजित नागरिक सुसंवादा दरम्यान ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, नगराध्यक्षा शोभा माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के,  पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट नागरिक, पोलीस कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
नांगरे-पाटील पुढे म्हणाले, शहरातील शाळा-कॉलेज परिसरातील पान टपर्‍या, अतिक्रमणे व सम-विषम पार्किंग व्यवस्था याकामी पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवतील मात्र शहराचे संरक्षण शहरानेच करावे यासाठी एकजूट कायम ठेवा. वाळू व्यवसाय व इतर अवैध व्यवसायामुळे वाईट प्रवृत्ती आणि गुंडगिरी थोपविण्यासाठी वेळीच पोलिसांच्या मदतीने त्यावर अंकुश ठेवा. वडूज पोलीस ठाण्यात  अधिकार्‍यांची संख्या वाढविण्यासाठी पोलीस अधिक्षकांना सूचना देणार आहे. शहरात लोकसहभागातून सीसीटीव्ही लावले तर गावची सुरक्षा वाढणार आहे. 

प्रास्तविक उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी मानले. याप्रसंगी मायणी, औंध, पुसेगाव, म्हसवड, दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.