Fri, May 24, 2019 07:21होमपेज › Satara › तालुक्यात 72 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

तालुक्यात 72 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 10:23PMकराड : प्रतिनिधी

हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या तालुक्यातील 72 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागाने ‘रोपे आपल्या दारी’ ही मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे कराड तालुक्यात 100 हेक्टर क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे.

तालुक्यात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. राज्य शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला आहे. त्याअंतर्गत कराड तालुक्यात 72 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. 31 जुलैपर्यंत हे उद्दीष्ट साध्य केले जाणार आहे. 1 जुलै रोजी सह्याद्री कारखाना परिसरात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच शेणोली येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष 

ना. डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. 2 जुलै ते 10 जुलै या कालावधीत कराड तालुक्यात सर्वच विभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. 7 जुलैला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील यांच्या हस्ते विंग येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण काळाची गरज असून संवर्धनही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या पुढील पिढीसाठी पर्यावरण संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.