Sat, Jun 06, 2020 15:49होमपेज › Satara › साताऱ्यातील महारॅलीत शरद पवारांची क्रेझ (video)

साताऱ्यातील महारॅलीत शरद पवारांची क्रेझ (video)

Published On: Sep 22 2019 3:57PM | Last Updated: Sep 22 2019 4:22PM

साताऱ्यातील महारॅलीत  शरद पवार यांची क्रेझसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातार्‍यात आल्यानंतर महारॅलीसाठी उपस्थित युवकांनी उपस्थिती लावून ‘मी शरद पवार,’ ‘आमचे साहेब.. पवार साहेब,’ ‘पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा जल्लोषात घोषणा दिल्या. रॅलीसाठी हजारो युवक राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर घेवून सहभागी झाल्याने सातार्‍यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले. शरद पवार यांच्यासोबत सेल्फीसाठी तरुणाईची झुंबड उडाल्याने राष्ट्रवादीची ‘क्रेझ’ असल्याचे समोर आले.

खासदार शरद पवार यांचा रयत शिक्षण संस्थेवरील कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महारॅलीचे आयोजन केले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजल्यापासूनच पवई नाका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकांची गर्दी झाली. दुचाकीची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघण्याचे निश्चित झाल्यानंतर दुपारी अडीचा वाजता खा.शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ.मकरंद पाटील हे पोवई नाक्यावरील शिवतिर्थावर आले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले

खा.शरद पवार रॅलमीध्ये येताच तरुणाईने अक्षरश: जल्लोषाला सुरुवात केली. खा.शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खा.शरद पवार यांच्यासाठी जिप्सी ठेवण्यात आली होती. कारमधून उतरुन ते जिप्सीमध्ये बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला. तब्बल 15 मिनिटे हा गराडा हालण्याचे नाव घेत नव्हता. खा. शरद पवार यांनीही तरुणाईला प्रतिसाद देत त्यांच्यासोबत सेल्फी काढली. यानंतरही युवक हालत नसल्याचे पाहून पवार यांनी सर्वांना विनंती करत पुढे चलण्यास सांगितले.