Tue, Nov 13, 2018 21:42होमपेज › Satara › माजी मुख्यमंत्र्यांकडून लाखाची मदत

माजी मुख्यमंत्र्यांकडून लाखाची मदत

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 11:23PMउंडाळे : प्रतिनिधी

येणपे परिसरातील पिडित कुटुंबियांची भेट घेत शनिवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वैयक्तिकरित्या एक लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या निर्भया व राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

येणपे परिसरात पाच दिवसांपूर्वी विवाहितेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेव्हापासून गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर हे पोलिस पथकासह परिसरात ठाण मांडून आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी आ. आनंदराव पाटील, इंद्रजित चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिडित कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी घटनेचा निषेध नोंदवत न्याय मिळावा, म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर न्याय मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. चव्हाण यांनी दिली.