Thu, Apr 25, 2019 14:13होमपेज › Satara › उरले नुसतेच खड्डे...रोपटी कुठे झाली गायब?

उरले नुसतेच खड्डे...रोपटी कुठे झाली गायब?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाखरी : स. रा. मोहिते

फलटण तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी खात्यांतर्गत गेल्या महिन्यात व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जुन-जुलैमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम धुमधडाक्यात करण्यात आले. मात्र, वृक्षारोपणासाठी खोदलेल्या किती खड्ड्यात रोपे लावली, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. तालुक्यासाठी शासनाने किती खर्च केला व किती झाडे लागली, याचा खुलासा करावा, अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वकांक्षी शतकोटी वृक्षारोपणाची योजना गत मे, जुन व जुलै महिन्यात सरकारच्या व विविध संस्थांच्या माध्यमातून राबवली गेली. वृक्ष लागवडीसाठी रस्त्याच्या दुतर्फा तसेच विविध गावच्या ग्रामपंचायतीच्या प्रांगणात व मैदाने स्मशानभूमी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे खोदण्याचे देखावे केले. त्या खड्ड्यात रोपे लावली गेली काही काही गावात वृक्ष लागवडीचा डांगोरा पिटण्यात आला. तसेच तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्तफा झाडासाठी. खड्डे काढले पण या सर्वच खड्ड्यात रोपे लावली का? हा मोठा प्रश्‍न आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी लाखो रोपे पुरवली. या योजनेसाठी सरकारचे लाखो रुपये खर्च झाले. पण एवढा मोठा पावसाळा होऊन देखील खर्‍या अर्थाने सरकारच्या कागदोपत्री वृक्ष लागवडीचा जेवढा शंभर टक्के आराखडा दाखवण्यात आला तो आज प्रत्यक्षात  दिसत नाही. तालुक्यात झाडे किती लावली? खड्डे किती काढले ? तार कंम्पाऊंड किती केले ? आळी किती घेतली? प्रत्यक्षात एक कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रमाची फलश्रूती काय ? योजनेवर तालुक्यासाठी किती खर्च झाला व प्रत्यक्ष जिवंत झाडांची संख्या किती आह? याचा खुलासा वृक्षप्रेमी नागरिकांना व्हावा अशी मागणी होत आहे.