होमपेज › Satara › शिंगाडे यांच्यावर मनसेची कारवाई

शिंगाडे यांच्यावर मनसेची कारवाई

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 11:59PMवडूज : वार्ताहर

शहीद जवानांच्या जमीन हडप प्रकरणी आरोप झालेले खटाव तालुका मनसे तालुकाप्रमुख दिगंबर शिंगाडे यांच्यावर मनसेकडून कारवाई करण्यात आली. जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर झालेल्या तक्रारींची दखल घेत हे पाऊल उचलले. दरम्यान, शिंगाडे यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दै. ‘पुढारी’ ने सोमवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मनसे जिल्हाध्यक्षांनी तातडीने ही कारवाई केली. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची विचारधारा या जिल्ह्यात  तळागाळात पोहोचवली. आमचे दैवत राज ठाकरे यांची एकच शिकवण आहे की, कोणत्याही वाईट गोष्टींना व अपप्रवृत्तींना थारा देऊ नये. मनसे तालुकाप्रमुख दिगंबर शिंगाडे यांच्यावर शहीद जवान जमीन हडप प्रकरणाची जोपर्यंत सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी खटाव-माण तालुक्यांतील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.