Thu, Sep 20, 2018 06:19होमपेज › Satara › महिलेचे अपहरण करून  विष पाजण्याचा प्रयत्न

महिलेचे अपहरण करून  विष पाजण्याचा प्रयत्न

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:04PMवडूज : वार्ताहर

वडूज येथील पेडगाव रोड येथे कामानिमित्त आलेल्या एका महिलेचे बळजबरीने अपहरण करून माझ्यावरील तक्रार माघारी घे, असे म्हणत विष पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  तुषार भोसले व दोन अनोळखी व्यक्‍ती (रा. दहिवडी, ता. माण) यांनी, बुधवारी (दि. 24) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास यातील महिला वडूज येथील पेडगाव रस्ता येथे तिच्या कामानिमित्त गेली असता, तेथून या महिलेस तुषार व त्याच्या दोन अनोळखी व्यक्‍तींनी तिचे अपहरण करून सफेद रंगाच्या चारचाकीमध्ये जबरदस्तीने बसवून शिवेंद्र

ढाबा, खांडसरी चौक, दहिवडी येथील खोलीमध्ये तिला नेले. तेथे तुषार, त्याचे आई-वडील व दोन अनोळखी व्यक्‍तींनी, तू आमच्या विरुद्ध केलेली तक्रार माघारी घे, असे म्हणून तिला मारहाण करून विष पाजले. संबंधित महिलेने त्यानंतर पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिला उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल केलेे. या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून तपास पो. उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर करीत आहेत.