Fri, May 24, 2019 06:51होमपेज › Satara › पिराचा डोंगर परिसरात गव्यांचा वावर

पिराचा डोंगर परिसरात गव्यांचा वावर

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:47PMउंडाळे : प्रतिनिधी 

सातार, सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर जिंती (ता. कराड ), पणुंब्रे (ता. शिराळा) या गावांच्या डोंगरात शेतकर्‍यांना जंगली गव्यांचा कळप निदर्शनास आला. या कळपाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान केले आहे.  याबाबतची माहिती, स्थानिक नागरिकांना समजतात  पणुंब्रे,गिरजावडे, जिंती, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी  येथील ग्रामस्थ आणि युवकांनी डोंगराकडे धाव घेतली. पिराचा डोंगर सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर आहे.

जिंती परिसरातील शेतकर्‍यांनी या गव्यांना हुसकावून लावले.  कळपाने डोंगरातील गवताच्या गंजीचे नुकसान केले आहे. रब्बी पिकांचेही नुकसान केले आहे. गवे आंबा घाट व चांदोली आभयारण्य परिसरातील आहेत. या गव्याचा बंदोबस्त  करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.