होमपेज › Satara › वाकुर्डे  योजनेत लक्ष घालणार : डॉ. सुरेश भोसले 

वाकुर्डे  योजनेत लक्ष घालणार : डॉ. सुरेश भोसले 

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 8:48PM

बुकमार्क करा
उंडाळे : प्रतिनिधी  

कराड दक्षिण विभागात मोठा उद्योग उभा राहणे बरोबर शेतीला पाणी मिळणे आवश्यक आहे. पण गत वर्षी राजकीय स्वार्थासाठी वाकुर्डे बु॥ योजनेच्या  पाण्याचे  काहींनी  राजकीय भांडवल करुन  कराड दक्षिणमधील लोकांची पिके वाळवली. मात्र, चालू वर्षी या वाकुर्डे योजनेत आम्ही लक्ष घालून विभागातील शेतकर्‍यांना पाणी देवू, असे आश्‍वासन यशवंतराव  मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.  

सवादे ता. कराड येथे डॉ. अतुल भोसले यांची पंढरपूर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाले बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णेचे संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, जितेंद्र पाटील, सरपंच लिलावती कांबळे,  मठाधिपती बाजीराव मामा कराडकर,  उपसरपंच संजय शेवाळे, हणमंतराव थोरात, शैलेंद्र थोरात, ह.भ. प.ज्ञानेश्‍वर माऊली, सदाभाऊ शेवाळे, हर्षवर्धन मोहिते यांची उपस्थिती होती.  

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्यावर्षी या डोंगरी भागात वाकुर्डे बु॥  योजनेच्या पाण्याचा प्रश्‍न चर्चेचा झाला होता. शेतकर्‍यांनी पैसे भरूनही त्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाले नाही तर काही शेतकर्‍यांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची पिके वाळून गेली होती. त्यासाठी या विभागातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे.  या विभागात नवे    सोलर सिस्टीम सारखे  नवनवीन उद्योग उभारण्यासाठी प्राधान्य देवून लोकांना रोजगार मिळवून देणार आहे.  

डॉ. अतुल भोसले म्हणाले, या विभागातील परिस्थिती बदलत चालली असून ही परिवर्तनाची नांदी आहे. जिल्हा नियोजन मधून मतदार संघातील कामांसाठी 1 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सवादे गावाने आपले एकी कायम ठेऊन येणार्‍या निवडणुकीत गावाची एकहाती सत्ता आपलीच आली पाहिजे यासाठी कामाला लागावे.  यावेळी बाजीराव मामा कराडकर, महिंदकर पेंटर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजय नांगरे यांनी केले. संताजी थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.