Mon, Sep 24, 2018 16:56



होमपेज › Satara › लोकसभेच्या हॅट्रीकसाठी उदयनराजे मैदानात 

लोकसभेच्या हॅट्रीकसाठी उदयनराजे मैदानात 

Published On: Feb 14 2018 8:35PM | Last Updated: Feb 14 2018 8:35PM



सातारा : प्रतिनिधी

लोकसभेच्या हॅटट्रीकसाठी खासदार उदयनराजे भोसले पुन्हा मैदानात उतरत असून, जिल्हा परिषदेच्या मैदानावर २४  फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील नेत्यांना निमंत्रण देवून उदयनराजे यांनी मोठी खेळी खेळली आहे. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी सातारा विकास आघाडीकडून जंगी नियोजन सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तमाम जनतेच्या साक्षीने होणारा हा सोहळा नेटका पार पडावा यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी सातारा पालिकेच्या मंगल कार्यालयात मध्यवर्ती कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाची उत्कंठा जिल्हावासियांना लागली आहे.