Thu, Jan 24, 2019 04:08होमपेज › Satara › Viral Video : ‘उदयनराजेच तुमचे आई आणि वडील’

Viral: ‘उदयनराजेच तुमचे आई आणि वडील’

Published On: Dec 01 2017 2:29PM | Last Updated: Dec 01 2017 2:35PM

बुकमार्क करा

सातारा : पुढारी ऑनलाईन 

‘आयुष्यात खूप मोठे व्हा, एकच सांगतो तुमचे आई-वडील उदयनराजे आहेत, एवढंच सांगतो, आय लव्ह यू टू मच’ असा भावनिक संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सातऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अनाथ आश्रमातील मुलांना दिला आहे. 

उदयनराजे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. उदयनराजेंच्या भावनिक स्वभावामुळेच त्यांचे अनेक चाहते आहेत.. साताऱ्यातील एका अनाथ आश्रमात त्यांनी  ब्लँकेटचे वाटप केले. यावेळी ते बोलत होते. ‘अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’ असेही ते म्हणाले. 

काय म्हणाले उदयनराजे...

‘आयुष्यात खूप मोठे व्हा, एवढीच खंत वाटते की, आम्हाला आई-वडील मिळाले, तुम्हाला नाही, एकच सांगतो तुमचे आई-वडील उदयनराजे आहेत.  मी कधीही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, तुमच्यावर कोणी अन्याय केला तर मी सहन करणार नाही. ‘आय लव्ह यू टू मच’