Mon, Jul 13, 2020 00:23होमपेज › Satara › सातारा : कृष्णा हॉस्पिटलमधून २ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

सातारा : कृष्णा हॉस्पिटलमधून २ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

Last Updated: May 25 2020 3:32PM

कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.कराड : पुढारी वृत्तसेवा

येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या वनवासमाची येथील २४ वर्षीय युवक आणि ७५ वर्षीय वृद्ध महिला या दोन कोरोनामुक्त झाल्या आहेत. या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण ५६ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

वाचा : कराड, पाटण तालुक्यात 14 पॉझिटिव्ह

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या कोरोनामुक्त रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

वाचा : सातारा जिल्हा तीनशे पार