Thu, Feb 21, 2019 06:03



होमपेज › Satara › अपघातात मामा ठार, भाचा गंभीर जखमी 

अपघातात मामा ठार, भाचा गंभीर जखमी 

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:29PM



खंडाळा : वार्ताहर 

अहिरे ते वहागाव (पुनर्वसन) दरम्यान लोणंद-खंडाळा मार्गावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास आयशर टेम्पो आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर त्याचा भाचा गंभीर जखमी झाला.  

याबाबत माहिती अशी, ज्ञानेश्‍वर रांजणे (वय 35, रा. वहागाव पुन.) यांचे अहिरे येथे दुकान आहे. बंद करून ते घरी  निघाले होते.  ते बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहुन आले होते.आपल्या मित्राच्या घरी वहागाव  (पुन.) अजनूज येथे ते थांबले होते. रात्री साडेनऊ तब्बेत बरी नसतानाही त्यांनी घरी जाण्याचे ठरवले. तेथील मित्राची अल्टो कार (एमएच12 एचएन 9789) घेऊन सोबत भाचा प्रसाद यशवंत भिलारे यास घेऊन घरी निघाले.

मात्र, घरापासून अवघ्या अर्धा किलोमिटर अंतरावर आयशर टेम्पोशी (एमएच 11 एएल 1204) त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा जबरदस्त होता की, कारचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात ज्ञानेश्‍वर रांजणे जागीच ठार झाले तर प्रसाद भिलारेदेखील गंभीर जखमी झाला. त्यास शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.  प्रसाद हा राजेंद्र विद्यालय, खंडाळा येथे 12 वी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. अपघाताची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली असुन अधिक तपास उपनिरीक्षक मोहन कदम करत आहेत.