Sat, Feb 23, 2019 17:15होमपेज › Satara › सातारा : महामार्गावर ट्रक जळून खाक(video)

सातारा : महामार्गावर ट्रक जळून खाक(video)

Published On: Feb 10 2018 10:34AM | Last Updated: Feb 10 2018 10:34AMसातारा : प्रतिनिधी 

पुणे-बेंगलोर महामार्गावर भूसा घेऊन जाणार्‍या ट्रकला आग लागून ट्रक जळून खाक झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आज सकाळी ६ वाजता झालेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्‍प झाली होती.

कोल्‍हापूरकडे भूसा घेऊन निघालेला मालट्रक भरतगावनजीक हेरंब मंगल कार्यालयाजवळ आला असता त्या ट्रकच्या वरील भागातून धूर येत असल्याचे आढळले. चालकाने यासाठी ट्रक थांबवला. मात्र, अर्धा तास कोणतीही मदत मिळाली नाही. तासाभरानंतर अजिंक्यतारा आणि सातारा पालिकेची अग्‍निशामक गाडी दाखल झाली. तोपर्यंत ट्रक जळून बेचिराख झाला. 

घटनास्थळी पोलिस सुमारे अर्धा तास उशिरा आले. ट्रकचे टायर फटून मोठा आवाज झाल्याने नागरिकांत घबराट होती.