Wed, Apr 24, 2019 22:23होमपेज › Satara › औरंगाबाद : ट्रकच्या धडकेत इस्तेमासाठी जाणारा भाविक ठार

औरंगाबाद : ट्रकच्या धडकेत इस्तेमासाठी जाणारा भाविक ठार

Published On: Feb 23 2018 4:52PM | Last Updated: Feb 23 2018 4:44PMकन्नड : प्रतिनिधी

औरंगाबाद-चाळीसगाव महामार्गावर भांबरवाडी येथे वाळूच्या हायवा ट्रकने धडक दिल्याने एका ३५ वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला. साबीर खाने मोहम्‍मद असे मुळच्या मध्यप्रदेशचा असणार्‍या मृताचे नाव आहे. ते इस्‍तेमासाठी जात असताना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

साबीर हे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नमाजासाठी थांबले होते. नमाज पढून टेम्‍पोत बसण्यासाठी जात असताना चाळीसगावकडून येणार्‍या वाळूच्या हायवा ट्रक (एमएच २०, ६६७७)ने त्यांना जोराची धडक दिली. यात साबीर यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी साजिद खान हबीब खान यांनी तक्रार दाखल केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारूती पंडित यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. हायवा ट्रक ताब्यात घेतला असून अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्‍हा नोंद झाला आहे. तालुक्यात व जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्‍ह्यातून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. पण, याविरुद्ध पाहिजे तेवढ्या प्रमाणात कारवाई होत नाही आणि वाहनांचा वेगही कमी होत नाही. त्यामुळे एका भाविकाला जीव गमवावा लागला आहे.