Mon, May 20, 2019 10:47होमपेज › Satara › सातारा : ट्रॅक्सची ट्रकला धडक, चिकोडीतील महिला ठार

ट्रॅक्सची ट्रकला धडक, चिकोडीतील महिला ठार

Published On: May 29 2018 10:36AM | Last Updated: May 29 2018 12:39PMसातारा / चिकोडी :  प्रतिनिधी

देवदर्शन करून परतणाऱ्या क्रूझर गाडीचे टायर फुटून ट्रकला धडकल्याने एक महिला जागीच ठार तर ६ जण जखमी झाल्याची घटना सातारा येथील राष्ट्रीय महामार्गावर अजंठा चौकात पहाटे साडे चार वाजता घडली आहे. सर्व जण चिकोडी तालुक्यातील करोशी गावचे आहेत. 

चंपाबाई बाळकू डोंगरे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की, करोशी येथील डोंगरे कुटुंबीयांतील ९ महिला,  पुरुष ३, मुले ७ असे १९ जण तीन  दिवसापूर्वी क्रूझर वाहनाने देव दर्शनसाठी निघाले होते. 

शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी येथे देवदर्शन करून गावी येत होते. यावेळी सातारा येथील राष्ट्रीय महामार्गावरील अजंठा चौकात अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून समोरील ट्रकला मागून धडक बसली. 

या अपघातात वाहनाच्या डाव्‍या बाजूचा चक्‍काचूर झाला आहे. ट्रक्‍समध्ये समोर बसलेल्या सुरेश डोंगरे (वय ४०) यांना छातीला गंभीर दुखापत झाली तर मधल्या सीटवर बसलेल्या चंपाबाई बाळकू डोंगरे यांचा घाबरल्याने जागीच मृत्यू झाला. रुक्मिणी राजू डोंगरे (वय ४५) मंजुळा दुंडाप्पा डोंगरे (४४), अनिता शंकर डोंगरे (४०),  यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर ड्रायव्हर संतोष राजू डोंगरे (२५) यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.  दीपक बाळकू डोंगरेला हे ही जखमी आहेत. जखमींना सातारा येथील सिटी इस्पितळात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ही घटना समजताच करोशीतील डोंगरे कुटुंबि्यावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.