Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Satara › कराड : आराम बस घुसली ऊसाच्या ट्रॉलीमध्ये

कराड : आराम बस घुसली ऊसाच्या ट्रॉलीमध्ये

Published On: Jan 30 2018 8:28AM | Last Updated: Jan 30 2018 11:44AMकराडः प्रतिनिधी

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत डी मार्ट समोर आराम बसने ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ट्रॉलीतील निम्‍मा ऊस बसच्या काचा फोडून आत गेला. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही. मात्र, बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये बसच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या बस चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

मलकापूर येथील डी मार्ट समोर ऊसाने भरून निघालेल्या टँक्टर ट्राँलीमध्ये ट्रँव्हल्स पाठीमागून घुसली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक महामार्गावरून सेवा रस्त्यावर वळवली व जखमींना रुग्णालयात पाठवले. ट्राँलीमध्ये घुसलेली ट्रँव्हल्स काढण्याचे काम सकाळी आठ वाजेपर्यंत सुरु होते.

इतर बातम्या  

कंडोम वापरणार्‍या तरुणी, महिलांच्या संख्येत वाढ

आठ महिन्यांच्या चिमुरडीवर भावाकडून बलात्कार    

U 19 विश्वचषक : पाकचा ६९ धावात खुर्दा; भारत अंतिम फेरीत दाखल  

कोल्हापूर : चालकाच्या चुकीने अपघात?