Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Satara › ट्रॅफिक पोलिसाने दुचाकी चोरटा 'रेडहँड' पकडला

ट्रॅफिक पोलिसाने दुचाकी चोरटा 'रेडहँड' पकडला

Published On: Aug 16 2018 2:44PM | Last Updated: Aug 16 2018 2:54PMसातारा : प्रतिनिधी

भूविकास चौकातील हॉटेल आंबेसेटर परिसरात एका दुचाकीचे लॉक तोडत असतानाची घटना ट्राफिक पोलिसाने पाहिल्यानंतर संशयिताला हटकले. पोलिसाला पाहताच चोरट्याने धूम ठोकली मात्र यावेळी चोरट्याला थरारक पाठलाग करून रेडहँड पकडले. दरम्यान, संशयिताकडे पोलीस चौकशी करत आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूविकास चौकात ट्राफिक पोलीस हवालदार विनायक मानवी कर्तव्य बजावत होते. यावेळी त्याच परिसरात एक व्यक्ती बराचवेळ दुचाकीजवळ घुटमळत होता.  त्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ते घटनास्थळी गेले. पोलिसाने पाहिले असता चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसाने त्याबाबत विचारताच तो चोरटा तेथून पळून जाऊ लागला. पोलिसाला खात्री झाल्याने त्यांनी त्याचा थरारक पाठलाग केला. सुमारे ३०० मीटर अंतरावर हॉटेल सुरुबन येथे पकडण्यात आले. दरम्यान, संशयिताला शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.