Fri, Feb 22, 2019 23:58होमपेज › Satara › सोनगावमध्ये वीज कोसळल्याने युवक ठार 

सोनगावमध्ये वीज कोसळल्याने युवक ठार 

Published On: Apr 08 2018 5:36PM | Last Updated: Apr 08 2018 5:36PMसातारा : प्रतिनिधी

जावली तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी ही  दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सोनगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी आदिनाथ दिनकर मोरे (वय ३२ रा. सोनगाव) हे बेशुद्ध झाले. 

आदिनाथ यांना कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.