होमपेज › Satara › सातारा : पोहण्यासाठी गेलेल्‍या तिघांचा बुडून मृत्‍यू 

सातारा : पोहण्यासाठी गेलेल्‍या तिघांचा बुडून मृत्‍यू 

Published On: May 22 2018 2:47PM | Last Updated: May 22 2018 2:47PMवाई (जि. सातारा): प्रतिनिधी

वाई तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. यश सुभाष दाभाडे (वय १३ रा. बावधन), रंगदास शामराव सळमाके(वय २० रा. शेंदुरजणे) आणि रमेश विनायक जाधव(वय २८ रा. खानापूर) अशी मृत्‍यू झालेल्‍यांची नावे आहेत. 

सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. त्यामुळे अनेक तरुण विहिरी, कालवे आणि तलावातथे पोहण्यासाठी जात आहेत. सोमवारी सायंकाळी यश, रंगदास, आणि रमेश पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्‍याने ते पाण्यात बुडाले. यापैकी यश आणि रंगदास यांचे मृतदेह मंगळवारी सकाळी मिळून आले आहेत. तर, रमेश याचा मृतदेह अद्याप मिळाला नसून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.