Mon, Apr 22, 2019 12:03होमपेज › Satara › कराड : सराईत तिघा गुन्हेगारांना अटक 

कराड : तिघा सराईत गुन्हेगारांना अटक 

Published On: Aug 27 2018 12:01PM | Last Updated: Aug 27 2018 12:00PMकराड : प्रतिनिधी 

येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने सराईत तिघा गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मोटरसायकलींसह लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवार दिनांक २६ रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेले गुन्हेगार पाटण तालुक्यातील असून त्यांनी काही दिवसांपूर्वी कराडमध्ये एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहितीही समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.