Thu, Jan 24, 2019 07:51होमपेज › Satara › भेसळीच्या संशयावरुन ४९ पोती बर्फी जप्त (व्हिडिओ)

भेसळीच्या संशयावरुन ४९ पोती बर्फी जप्त (व्हिडिओ)

Published On: Jan 27 2018 12:52PM | Last Updated: Jan 27 2018 1:12PMभुईज : प्रतिनिधी 

अहमदबादवरुन गोव्याकडे १ हजार ४०० किलो बर्फी घेऊन जाणाऱ्या वाहनावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. सुमारे दीड लाख रुपये किंमतच्या बर्फीमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली. आनेवाडी टोलनाक्यावर मध्यरात्री गस्त घालताना बर्फिची ४९ पोती जप्त केली.

भेसळीच्या संशयावरुन जप्त आलेल्या बर्फीची पुढील तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ही कारवाई केली. त्यांनतर जप्त केलेला माल अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी दत्तात्रय साळुंखे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच अधिक तपास भुईंज पोलिस करीत आहेत.