Thu, Jul 18, 2019 02:12होमपेज › Satara › पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण हिसकावून दोघांचा पोबारा

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण हिसकावून दोघांचा पोबारा

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:16PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी 

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे  सोन्यांचे 1 लाख 26 हजारांचे साडेचार तोळ्याचे गंठन व मंगळसुत्र हिसकावून दोघेजण पसार झाले. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी सौ. सुजाता पांडुरंग रणवरे रा. स्वामी विवेकानंद नगरफलटण या दि.11 रोजी दु.1 वाजता सजाई गार्डन येथे एका लग्नावरुन स्कुटीगाडीवरून घरी परतत होते. यावेळी दोन युवक त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या  लक्षात आल्यानंतर त्यांनी चुलत सासरे मुगुटराव रणवरे यांच्या घराजवळ गाडी थांबवली.

त्याचवेळी दोघांपैकी एक युवक त्यांना कार्ड दाखवून पत्ता विचारू लागला. सौ. रणवरे कार्डवरील पत्ता पाहत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले. त्योळी रणवरे यांनी चोरट्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे अर्धे गंठन तुटून त्यांच्या हातात आले तर 9 पैकी साडेचार तोळ्याचे 1 लाख 26 हजारांचे गंठण चोरट्यांच्या हाती लागले. रणवरेंनी आरडाओरडा करेपर्यंत दोघे पसार झाले. गाडी चालविणाराच्या अंगात विटकरी रंगाचे जॅकेट होते दुसर्‍याच्या अंगात निळसर रंगाचा शर्ट होता. दोघांच्या  पाठीमागे सॅक होत्या व उंचपूरे व गोरे होते. तपास सपोनि देसाई करत आहेत.