Thu, Sep 20, 2018 16:02होमपेज › Satara › वाईत चोरट्यांचा धुमाकूळ; ६ घरे फोडली (Video)

वाईत चोरट्यांचा धुमाकूळ; ६ घरे फोडली (Video)

Published On: Aug 29 2018 11:49AM | Last Updated: Aug 29 2018 11:50AMकुडाळ : प्रतिनिधी

वाईत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत ६ घरे फोडल्याची घटना घडली आहे. बावधान, वाई येथे काल रात्रक्ष २ ते ३ च्या सुमारास चोरट्यांनी साईनगर परिसरात घरफोडी केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बावधन येथील साईनगर परिसरात अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी पोपट पिसाळ, किसन पिसाळ, रावसाहेब भोसले. दिनकर राऊत, विश्वास राऊत यांची घरे फोडली. या घरांमधील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली असून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरु आहे.

(व्हिडिओ : इम्तियाज मुजावर)