Sat, Nov 17, 2018 22:58होमपेज › Satara › गुंड शेंबडा राजाचा मृत्यू

गुंड शेंबडा राजाचा मृत्यू

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 11:15PMसातारा : प्रतिनिधी

बोगदा परिसरात वास्तव्य करणारा व सुमारे 15 गुन्हे दाखल असणारा गुंड राजू रामदास नलवडे उर्फ शेंबडा राजा याचा गुरुवारी मृत्यू झाला.  दरम्यान, रात्री उशीरापर्यंत त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

शेंबडा राजा याच्यावर सातारा शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा लागली असून पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाईही केली होती. 1990 च्या दशकात त्याची बोगदा परिसरात दहशत होती. खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असून माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांनीही दोन वर्षापूर्वी शेंबडा राजाविरुध्द तक्रार दिली होती.

पोलिसांच्या लिस्टवर असणार्‍या शेंबडा राजाचा गुरुवारी दुपारी अचानक मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची चर्चा पसरताच परिसरात त्याच्या घराभोवती मोठी गर्दी झाली होती. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याने पोलिस परिसरात आजूबाजूला थांबून होते. प्राथमिक माहितीनुसार त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असल्याची परिसरात चर्चा होती.