Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Satara › पीपल्स गव्हर्नर श्रीनिवास पाटील यशवंत भूमीत परतणार

पीपल्स गव्हर्नर श्रीनिवास पाटील यशवंत भूमीत परतणार

Published On: Aug 21 2018 11:10PM | Last Updated: Aug 21 2018 11:13PMकराड : प्रतिनिधी

मेघालयचे राज्यपाल श्री गंगाप्रसाद यांची सिक्‍कीम राज्याचे नूतन राज्यपाल म्हणून राष्ट्रपती भवनातून नेमणूक करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा कालावधी संपल्यामुळे ही नेमणूक करण्यात आली आहे.    

राज्यपाल श्रीनिवास पाटील हे श्री गंगाप्रसाद यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रात  कराडला परतणार आहेत. कराडचे माजी खासदार आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांची पाच वर्षांपूर्वी सिक्कीमच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती गेली. पाच वर्षे श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीममध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला. जनतेमध्ये मिसळणारे पहिले राज्यपाल म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. पाटील यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत कालावधीचा सिक्किम राज्य सरकारने नुकताच विशेष सन्मान करून गौरव केला होता.

सिक्कीमच्या जनतेने पीपल्स गव्हर्नर म्हणून त्यांचा विशेष सन्मान केला. तसेच सिक्कीम विद्यापीठाने त्यांचा डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला होता. श्रीनिवास पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सिक्कीमचे नाव पर्यटन क्षेत्रात उंचावण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे महाराष्ट्रातून लाखो पर्यटक राज्यात जाऊन आले. दरम्यान नूतन राज्यपाल आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीनिवास पाटील येत्या दोन दिवसात कराडला  परतणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.