Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Satara › जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (Video)

जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (Video)

Published On: May 25 2018 3:11PM | Last Updated: May 25 2018 3:11PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दालनात शुक्रवारी दुपारी शिक्षकाने स्‍वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न केला. अनिल दत्तात्रय गायकवाड (वय ५३ रा. विसावा पार्क) असे आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. 

पोलिस आणि नागरिकांनी या शिक्षकाला वेळीच रोखल्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेतले असून, रॉकेलचे कॅनही जप्त केले आहे. पोलिसांनी यावेळी शिक्षकाची अंगझडती घेतली असता त्‍याच्याजवळ काडीपेटी नसल्याचे समोर आले आहे. 

 दरम्यान, अनिल गायकवाड हे पुसेगाव येथे शिक्षक होते. मात्र, सध्या ते निलंबित असून, संस्थेने चुकीची कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कारवाईप्रकरणी त्यांनी आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. 
अनिल गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.