Tue, Jan 22, 2019 11:39होमपेज › Satara › उत्तर तांबवेत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

उत्तर तांबवेत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 11:14PMकराड : प्रतिनिधी 

गावातील पडक्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. सडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर तांबवे (ता. कराड) येथे ही घटना घडली असून सुमारे आठ दिवसांपूर्वी त्याने गळफास घेतला असावा, असे घटनास्थळी बोलले जात होते. 

सुनील व्यंकट जाधव (वय 24, रा. उत्तर तांबवे, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.  सुनील जाधव हा काही महिन्यांपासून पुण्यातील खासगी कंपनीत कामाला होता. थोडासा अबोल स्वभावाचा असल्याने तो नेहमीच लोकांबरोबर कमी बोलत हेाता. नोकरीवर जाण्याबाबत तसेच कामावरून परत घरी येण्याबाबत तो नातेवाईकांना काहीच सांगायचा नाही. शनिवारी डॉ. हणमंत पाटील यांच्या पडक्या घरातून उग्र वास येत असल्याने परिसरातील काही ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाहिले असता घराच्या मागील भिंतीस भगदाड पडल्याचे व गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह दिसला. त्यामुळे ग्रामस्थांनी ही बाब कराड तालुका पोलिसांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, उपनिरीक्षक भापकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.