होमपेज › Satara › सातारा : पुढील महिन्यात कराडमध्ये स्वामी रामदेव बाबांचे योग शिबीर 

सातारा : पुढील महिन्यात कराडमध्ये स्वामी रामदेव बाबांचे योग शिबीर 

Published On: Mar 24 2018 10:57AM | Last Updated: Mar 24 2018 10:58AMकराड : प्रतिनिधी

भाजपाचे प्रदेश चिटणीस तथा पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात पुढील महिन्यात प्रथमच तीन दिवसांचे स्वामी रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत योग शिबीर होणार आहे. १४ एप्रिल ते १६ एप्रिल या वेळेत हे शिबीर कराडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार आहे. तसेच शेतकरी मेळावा, महिला मेळावा तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमही होणार आहेत.

डॉ. अतुल भोसले, भारत स्वाभिमान न्यासचे राज्य प्रभारी बापू पाडळकर, प्रदीप तांबवेकर, शेखर खापणे, निलेश पिसाळ, अनुपमा कोरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. भोसले, पाडळकर यांनी ही माहिती दिली.

डॉ. भोसले म्हणाले, स्वामी रामदेव बाबा यांची सोलापूर येथे ना. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट झाली. या भेटीवेळी सातारा जिल्ह्यात विशेषतः कराड तालुक्यात योग शिबीर आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता. त्यास त्यांनी त्वरित मंजुरी दिली असून पुढील महिन्यात १४ एप्रिल ते १६ एप्रिल या कालवधीत त्यांनी कराडला येण्याचे मान्य केल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. या तीन दिवसात योग शिबीरासोबत विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिलला पहाटे ५ ते सकाळी ७.३० या वेळेत योग शिबीर होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी दुपारी चार वाजता यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यावर शेतकरी मेळावा होणार आहे. ‘विषमुक्त शेती’ यासह ‘गायींचे संवर्धन’, ‘शेतीसह शेतीपूरक व्यवसाय’ आणि शेतकर्‍यांचे ‘उत्पन्न वाढावे’ म्हणून या शिबीरात स्वामी रामदेव बाबा मार्गदर्शन करणार आहेत.

१५ एप्रिल रोजी पहाटे योग शिबीर होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी सकाळी ११ वाजता कृष्णा हॉस्पिटल परिसरात वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वामी रामदेव बाबा मार्गदर्शन करणार आहेत. योग आणि त्यामाध्यमातून करिअर घडवता येते याबाबत यावेळी व्याख्यान होणार असून दुपारी ४ वाजता महिला पंतजली योग समितीकडून महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे

Tag: swami ramdevbaba, karad, yoga, camp