Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Satara › स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गांधीगिरी(व्हिडिओ)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गांधीगिरी(व्हिडिओ)

Published On: Dec 15 2017 6:34PM | Last Updated: Dec 15 2017 6:34PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कराड आणि कोरेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असलेल्या मसूर-रहिमतपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच्या निषेधार्थ वाहन चालकांना गुलाब पुष्प देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या मार्गावरून सावकाश प्रवास करा, असा संदेश दिला. तसेच चालकांनाच गुलाब पुष्प देत बांधकाम विभाग व प्रशासनाविरोधात आंधीगिरी आंदोलन केले.

मसूर-रहिमतपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्य खड्डे मुक्त होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली होती. मात्र, अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे आश्वासन पूर्ण होऊ शकलेले नाही. मसूर-रहिमतपूर मार्गावरील हेळगाव ते मसूर यादरम्यान खडी मोठ्या प्रमाणावर असल्याने या मार्गावर अपघात होवून वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. त्‍यामुळे रस्‍त्‍याची लवकरात लवकर दुरुस्‍ती करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या रस्‍त्‍यावरून ये-जा करणाऱ्यांना गुलाब पुष्‍प देवून आंदोलन केले.