कराड : प्रतिनिधी
आज सर्वच राजकीय पक्षांचे नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतात. त्यांच्या विचारांचा वारसा जपतात, असे ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना तिलांजली देत आहेत. कराडमध्ये तीन दिवस त्यांनी केवळ देखावा करुन चव्हाण यांच्या पवित्र स्थळाला अपवित्र केले आहे. त्यामुळेच या समाधीस्थळाचे सोमवारी कृष्णा-कोयनेच्या पाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुद्धीकरण केले.
आज महाराष्ट्रात यशवंत विचार पोरका झाला आहे. त्यामुळेच स्वाभिमानीचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल घराळ, प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, योगेश झांबरे यांच्यासह पदाधिकारी सकाळी ११.३० वाजता या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.