Tue, May 21, 2019 18:32होमपेज › Satara › ग्रामसेवकांवरील कारवाईबाबत स्वाभिमानीचे निवेदन 

ग्रामसेवकांवरील कारवाईबाबत स्वाभिमानीचे निवेदन 

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी

संघटनेच्या जोरावर भारतीय राज्यघटनेचा अपमान करून ग्रामसभेवर बहिष्कार टाकणार्‍या  ग्रामसेवकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसभा ही भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली आहे. ग्रामसभेच्या चार तारखा घटनेने निर्धारीत केल्या आहेत. अशा तारखांना संघटनेच्या जोरावर बहिष्कार टाकणे म्हणजे लोकसेवकांकडून राज्यघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणे आहे. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव आहे. त्याने ग्रामसभेत प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रश्‍नच येत नाही. परंतु ज्या लोकसेवक व ग्रामसेवकांनी भोंगळ कारभार केलेला आहे त्या कामाविषयी ग्रामसभेत ऊहापोह होणारच आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुनराव साळुंखे, उपाध्यक्ष राजू शेळके, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, संजय कांबळे, महेंद्र कांबळे, संदिप पाटील व शेतकरी उपस्थित होते.