Thu, Apr 25, 2019 12:17होमपेज › Satara › उद्योगपती अनिल तावरे यांची आत्महत्या

उद्योगपती अनिल तावरे यांची आत्महत्या

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:46PMफलटण : प्रतिनिधी
चौधरवाडी (ता. फलटण) येथील तावरे अर्थमुव्हर्सचे मालक उद्योगपती अनिल सदाशिव तावरे (वय 37) यांनी मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास फलटण येथील पर्णकुटी आपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तावरे यांनी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्षपद भूषवले आहे. तसेच काँग्रेसमध्येही त्यांनी चांगले काम केले. तर चौधरवाडी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम केले आहे. अल्पावधीतच ते उद्योजक म्हणून नावारूपास  आले होते. मात्र, त्यांनी अचानक अशी का आत्महत्या केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. याबाबतचा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस करत आहेत.