Mon, Jun 17, 2019 04:57होमपेज › Satara › सातारा : कृष्णनगर येथे युवतीची आत्महत्या

सातारा : कृष्णनगर येथे युवतीची आत्महत्या

Published On: Jul 09 2018 2:20PM | Last Updated: Jul 09 2018 3:55PMखेड : प्रतिनिधी

कृष्णनगर येथील किरण दशरथ सपकाळ ( वय 24) या युवतीने सोमवारी सकाळी  गळफास घेऊन आत्महत्या केली.  किरणचे वडील तिच्या लहान भावाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. तर आई घरात होती. यावेळी किरणसाठी शेजाऱ्यांच्या मोबाईलवर फोन आला होता. या फोनवर ती कोणाशी तरी बोलली. या नंतर तिने आईला मोबाईलसाठी रिचार्ज आणण्यासाठी बाहेर पाठवले. 

आई बाहेर गेल्यानंतर किरणने घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.