Sat, Nov 17, 2018 16:20होमपेज › Satara › ...अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करा : बळीराजा

...अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करा : बळीराजा

Published On: Feb 12 2018 2:19PM | Last Updated: Feb 12 2018 2:15PMकराड : प्रतिनिधी 

सातारा जिल्ह्यातील काही कारखाने सुरू होऊनही नियमाप्रमाणे ऊस गाळप केल्यानंतर १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पहिले बील दिलेले नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी व्याजासह पहिला हप्ता शेतकऱ्यांना द्यावा, त्याचबरोबर साखरेचे दर पडल्याचे कारण सांगून दर कमी करण्याचा प्रयत्न कारखानदारांकडून होत आहे. त्यामुळे अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर कारखानदारांनी व्याजासह ऊस बील द्यावे, अशी मागणी करत प्रसंगी मुंबईत मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सागर कांबळे, विक्रम थोरात, उत्तमराव खबाले यांच्यासह बळीराजाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी कराड विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पकंजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, डॉ. अतुल भोसले हेही उपस्थित होते.