Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Satara › वाठारच्या जवानाचा आसाममध्ये मृत्यू

वाठारच्या जवानाचा आसाममध्ये मृत्यू

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:30PM

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनिधी 

वाठार (किरोली) ता. कोरेगावचे सुपूत्र सुभेदार नारायण धोंडिबा ठोंबरे (वय 47) यांचा देशसेवा बजावत असताना आसाम  तेजपूरमध्ये  हृदयविकाराने मृत्यू झाला. 

सुभेदार नारायण ठोंबरे यांना हृदयविकाराचा त्रास होवू लागल्याने तेजपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैन्यदलाच्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी विमानाने गुवाहाटी ते दिल्ली येथे येणार आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता दिल्ली ते पुणे फ्लाईटने पुणे येथे येणार आहे. तिथे सैन्य दलाची मानवंदना होवून नंतर सातारा व वाठार किरोली येथे सकाळी अकरापर्यंत पार्थिव आणण्यात येणार आहे.

सुभेदार नारायण धोंडिबा ठोंबरे यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामपंचायतींमध्ये शोकसभा घेवून आदरांजली वाहण्यात आली. 

सुभेदार नारायण हे मार्च 1990 रोजी देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. आजपर्यंत त्यांनी जम्मू, पंजाब, राजस्थान, सिकंदराबाद, आसाम आदी ठिकाणी त्यांनी अठ्ठावीस वर्षे सेवा बजावली. त्यांच्या पश्‍चात  पत्नी शोभा, मुलगा सुरज (वय 19) व धीरज (वय 17) असा परिवार आहे.