Wed, Mar 27, 2019 06:31होमपेज › Satara › सातार्‍यात विद्यार्थी पालक बचाव समितीचा भव्य मोर्चा

सातार्‍यात विद्यार्थी पालक बचाव समितीचा भव्य मोर्चा

Published On: Jan 06 2018 7:38PM | Last Updated: Jan 06 2018 7:38PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात शनिवारी  महाराष्ट्र राज्य (विद्यार्थी व पालक ) बचाव कृती समिती व सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी मैदान  राजवाडा ते  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

शिक्षणाचे व्यापारीकरण व कंपनीकरण करणारे शासन विधेयक त्वरीत रद्द करावे. वाडीवस्ती व दुर्गम भागातील 10 विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने त्वरीत मागे घ्यावा. सन 2004-05 पासूनचे थकीत वेतनेतर अनुदान पुर्वीच्या  नियमाप्रमाणेच सर्व शाळांना देण्यात यावे. 2013 व 14 पासूनचे वेतनेतर अनुदानही 5 टक्केऐवजी 9 ते 12 टक्क्यांनी द्यावे.शिक्षकेतर सेवकांचा नवीन आकृतीबंध लागू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.  मोर्चात अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव फाळके भरत जगताप, अनिल माने, आर. वाय. जाधव, अजित साळुंखे, बाबुराव लोटेकर, मोहनराव जाधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  सहभागी झाले होते.