Thu, Jul 18, 2019 17:08होमपेज › Satara › सातारा : शाहूपुरी येथे नागरी सुविधा मिळणेबाबत रास्तारोको (व्हिडिओ)

सातारा : शाहूपुरी येथे नागरी सुविधा मिळणेबाबत रास्तारोको (व्हिडिओ)

Published On: Jan 02 2018 5:23PM | Last Updated: Jan 02 2018 5:25PM

बुकमार्क करा
कण्हेर : वार्ताहर 

साताऱ्यामधील शाहूपुरी येथील बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मुख्य रस्त्यावर मतकर झोपडपट्टी येथील नागरिकांनी रास्ता रोको केला. मतकर झोपडपट्टी येथील नागरिकांनी नागरी सुविधा त्वरीत मिळण्याकरीता सुमारे एक तास या रास्त्यावर आंदोलन केले.  दरम्यान वेळेतच शाहूपुरी पोलिसांनी आंदोलनास अटकाव केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. 

मतकर कॉलनीजवळील मुख्य रस्त्यावर झोपडपट्टीतील नागरिकांनी मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास अचानक रास्तारोको केल्याने शाहूपुरी पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक त्वरीत दुसर्‍या मार्गाने वळवली. नागरिकांनी आरडाओरड करुन घोषणा देत रास्ता रोको करुन आंदोलन केले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी लोकांना अटकाव करत शांतता राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. नागरिकांनी सुमारे एक तासानंतर जेल भरो आंदोलन सुरु केले आणि सर्वांनी थेट शाहूपुरी पोलिस स्टेशनला चालत जाणे पसंत केले. अखेर शाहूपुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पोलिसांच्या आश्‍वासनानंतर नागरिकांकडून शांतता बाळगण्यात आली.