Thu, May 28, 2020 09:56होमपेज › Satara › महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील महाकाय दगड फोडला (Video)

महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील महाकाय दगड फोडला (Video)

Published On: Jun 03 2018 2:39PM | Last Updated: Jun 03 2018 4:04PMमहाबळेश्वर : वार्ताहर

महाबळेश्वर आणि पोलादपूर या महामार्गावरील दगड गेल्या अनेक महिन्यापासून अडचणीचा ठरत होता. पावसाळा सुरू होणार असल्याने या दगडावरून दरड कोसळू नये म्हणून हा दगड हटवणे महत्वाचे होते. यासाठी आज (रविवार दि.१) सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुंग लावून हा दगड फोडला. यामुळे खूप मोठा आवाज होऊन  दगडाच्या ठिकर्‍या होऊन माती रस्त्यावर पडली.

दगडामध्ये सुरुंग लावल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ प्रवाशांना वाट पाहावी लागली. आता हा महाकाय दगड हटवला गेला असल्याने अपघाताची शक्यता कमी झाली आहे.