होमपेज › Satara › सामान्य घटकाला सुरक्षा देण्यास कटिबद्ध

सामान्य घटकाला सुरक्षा देण्यास कटिबद्ध

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 1:37AM
वडूज : वार्ताहर

खटाव-माण तालुक्यातील पाणी योजनांना रखडलेल्या कामांसाठी केंद्र सरकारकडून 24 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.  शेतकर्‍यांची कर्जमाफी करून  त्यांना दिलासा दिला आहे तर समाजातील सर्वसामान्य घटकाला सुरक्षिततेची हमी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले. 

वडूज येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, मनोज घोरपडे, जितेंद्र पवार, पं. स. सदस्य नीलादेवी जाधव, मेघा पुकळे, नगरसेवक अनिल माळी, वचन शहा, नगरसेविका किशोरी पाटील आदींची उपस्थिती होती.

ना. पाटील पुढे म्हणाले, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांचा शासन दरबारी विकास कामांबाबतचा पाठपुरावा इतरांना नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यातील विकासकामांना गती प्राप्त होत आहे. त्यांनी सुचवलेल्या संभाव्य पाणी योजनांचा आम्ही विचार करू.

डॉ. येळगावकर म्हणाले, दोन्ही तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या मात्र अपूर्ण अव्यस्थेतल्या पाणी योजना पूर्णत्वाकडे जातील, असा ठाम विश्‍वास येथील जनतेला मिळला आहे. या तालुक्यातील रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याने या भागातील दळणवळण सुधारुन शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य तो हमी भाव मिळेल. जि. प. सदस्य अनिल देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक तालुकाध्यक्ष विकल्प शहा यांनी केले. आभार प्रा. विक्रम घाडगे यांनी मानले. यावेळी सुशील तरटे, जयवंत पाटील, बाळासाहेब मासाळ, सतीश शेटे, कमलाकर देशमुख, ग्रामस्थ उपस्थित होते.