होमपेज › Satara › सातारा : जावयाने सासूला तलावारीने तोडले; पत्नी गंभीर

जावयाने सासूला तलावारीने तोडले; पत्नी गंभीर

Published On: Mar 23 2018 9:26AM | Last Updated: Mar 23 2018 9:32AMम्हसवड : प्रतिनिधी

शिवाजीनगर (कुकुडवाड, ता. माण) येथे गुरूवारी रात्री जावयाने सासूसह बायकोवर तलवारीने वार केले. या घटनेत सासू ठार झाली असून पत्‍नी गंभीर जखमी झाली आहे. पत्‍नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नरवणे (ता. माण) येथील आबासो बबन काटकर (वय ४०) हा  ठाणे येथील दिवा परिसरात पत्नी वैशाली काटकर दोन लहान मुलांसह राहत आहे. तो बीएसटीमध्ये इलेक्ट्रीकल विभागात नोकरी करत आहे. मंगळवार तो अचानक बायको व मुलांसह गावी नरवणे येथे आला होता. पत्नी वैशाली व त्याच्यात काही वर्षांपासून वाद होता. वैशालीचा मामा नरवणे येथे असल्याने ती मामाकडे गेली. पती पत्‍नीमध्ये वाद झाल्याने मामाने भाची वैशालीस शिवाजीनगर (कुकुडवाड) येथे माहेरी आईकडे पाठवली. त्यानंतर गुरूवारी रात्री आबासो सासरवाडीला गेल्यानंतर त्याचे सासू आणि पत्नीसोबत भांडण झाले.

या भांडणात आबासो याने सासू रंजना हणमंत भोसले (वय ५५ ) हिच्यासह पत्नी वैशालीवर तलवीरीने हल्ला केला. या हल्ल्यात सासू रंजना या जागीच ठार झाल्या तर वैशाली गंभीर जखमी झाली.

या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी आबासो काटकर याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tag : son in law attack, mother in law, murder, wife, injured, shivajinagar, taluka man, satara, pudhari crime news, satara news