Sat, Sep 22, 2018 20:42होमपेज › Satara › सातारा : मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा 

सातारा : मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा 

Published On: Feb 04 2018 1:53PM | Last Updated: Feb 04 2018 2:05PMसातारा: प्रतिनिधी

महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील अकाऊंट कोडचे आणि अधिनियमांचे उल्लंघन करून नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांची फॉर्म क्रमांक 64 वर स्वाक्षरी न घेताच मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी लाखो रूपयांची बिले काढली आहेत. त्यामूळे त्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली. 

गोरे यांनी नगराध्यक्षांची सही न घेताच फसवणूक करून अधिकाराचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, असेही या मागणीपत्रात म्हटले आहे.