Thu, Jul 18, 2019 17:02होमपेज › Satara › संगमनगर फाट्यावर श्रमदानातून मुजवले खड्डे

संगमनगर फाट्यावर श्रमदानातून मुजवले खड्डे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

एका बाजूला ग्रामस्थांकडून रस्त्यावरील धोकादायक खड्डे मुजविण्याकरता आंदोलने, श्राद्ध या सारख्या निषेधात्मक घटना होत असताना संगमनगर, विकासनगर येथील युवकांनी श्रमदानातून सातारा-कोरेगाव रस्त्यावरील संगमनगर ते संगममाहुली फाट्यापर्यंतचे खड्डे मुुजवून बांधकाम विभागाच्या डोळ्यात अंजन घातले. 

सातारा-पंढरपूर या राज्य महामार्गावरील कोरेगावला जोडणार्‍या संगमनगर ते संगममाहुली फाटा या मुख्य रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे धोकादायक झाले होते. वहानचालकांना या मार्गाने प्रवास करताना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत होती.

खड्डे मुजविण्यासाठी बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही कसलीच दखल घेतली जात नसल्याने अपघाताला निमंत्रण ठरलेल्या संगमनगर, विकासनगर, श्रीनगर, ते संगममाहुली फाटयापर्यंतचे तीन ते चार फुट खोलीचे मोठमोठे खड्डे युवकांनी श्रमदानातून मुरुम, माती टाकून मुजवले.