Mon, Apr 22, 2019 03:59होमपेज › Satara › सोशल मीडियाचा सकारात्मक वापर व्हावा : विश्‍वास नांगरे-पाटील

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर व्हावा : विश्‍वास नांगरे-पाटील

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:03PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सोशल मीडियाचा नकारात्मक वापर अधिक प्रमाणात होत असून वास्तविक त्याचा सकारात्मक  गोष्टीसाठी अधिक वापर होणे गरजेचे आहे. नकारात्मक वापरामुळे वादाचे विषय वाढत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर काळजीपूर्वक व अभ्यासपूर्णच व्यक्‍त  व्हावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले.

सातारा येथे आयोजित केलेल्या युथ पार्लमेंट स्पर्धेवेळी ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेते डॉ.अमोल कोल्हे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. नांगरे-पाटील पुढे म्हणाले, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. यावर अभ्यासपूर्ण मत व्यक्‍त केले जात नसल्याने वादाचे प्रसंग निर्माण होणाची वारंवार वेळ येत आहे. यामुळे विधायक कामासाठी सोशल मीडियाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, युथ पार्लमेंट चॅम्पियन स्पर्धेत महाविद्यालय गटात वाईचे किसनवीर महाविद्यालय, काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय वडूज यांनी बक्षीस पटकावले. आठवी ते बारावी गटात बापूजी साळुंखे विद्यालय असवली, संजीवन हायस्कूल पाचगणी, जयरामस्वामी विद्यामंदीर वडगाव यांनी यश मिळवले.
या कार्यक्रमासाठी अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.